Home बुलढाणा बुलढाणा अर्बन बँक व्यवस्थापकाचा मोबाईल बसस्थानकावरुन लंपास

बुलढाणा अर्बन बँक व्यवस्थापकाचा मोबाईल बसस्थानकावरुन लंपास

115

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:- स्थानिक बसस्थानकावर तेल्हारा येथे जाण्यासाठी बस मध्ये चढताना बुलढाणा अर्बन शाखा शेगावच्या व्यवस्थापकाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आज संध्याकाळी दरम्यान घडली आहे

या बाबत प्रविण विनायकराव पारोदे रा.तेल्हारा यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते बुलढाणा अर्बन बँक शाखा शेगाव येथे मॅनेजर आहेत. ते घरी जाण्यासाठी संध्याकाळी तेल्हारा बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी एम ३२ हा अलगद काढून लंपास केला.

याबाबत पारोदे यांनी बसमध्ये मोबाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मिळून आला नाही. सदर मोबाईलची किंमत ८ हजार रुपये असल्याचे पारोदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

याबाबत शेगाव पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द शेगाव पोलिसांनी कलम ३७९ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleअनिल जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागा च्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड
Next articleसिंदी,पळसगाव, गौळ-भोसा शिवारात पाण्याने केला कहर..