Home Breaking News सिंदी,पळसगाव, गौळ-भोसा शिवारात पाण्याने केला कहर..

सिंदी,पळसगाव, गौळ-भोसा शिवारात पाण्याने केला कहर..

305

 

शेतकऱ्यांचे व नदी तीरावरील रहीवाश्यांचे मोठे नुकसान

सिंदी रेल्वे ता.२७ : परिसरात बुधवारी (ता. २६) ला रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे सिंदी येथील नंदानदीला पुर येवुन पळसगाव बाई, गौळ-भोसा दिग्रज पहेलानपुर आलगाव शिवनगाव परसोडी भांसुली पिपरा हेलोडी हिवरा आदी गावाचा सिंदी रेल्वे या मुख्य शहराशी महापूरामुळे संर्पकच तुटला होता.

सिंदी शहरातील पुलापलीकडील भाग संपर्क तुटल्यामुळे पूर्ण पाण्याने वेढलेला होता. याची तत्काळ दखल घेत सिंधी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार वंदना सोनुने व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे आपला पूर्ण स्टाफ ज्या ज्या ठिकाणी रिक्स झोन आहे

त्या त्या ठिकाणी मदत कार्यास सुरुवात केली पळसगाव बाई येथेही दोन नद्यांचा संगम असून दोन्हीही नद्यांना महापूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे गावातील पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत कार्यालय संपूर्णपणे परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हल्ल्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तहसीलदार सोनवणे साहेब यांनी पळसगाव बाई येथील परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्हा उपाध्यक्ष धीरज लेंडे यांनी स्वतः पाहणी करून नदीकाठी असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे तसेच सर्व सरपंच महोदयांनी गाव पातळीवर मदत कार्य सुरू करावे असे सांगितले

व काही आपत्कालीन परिस्थिती आल्यास प्रशासनाला सोबत घेऊन तात्काळ मदत करण्यात येईल अशी हमी दिली गौळ भोसा शिवारातील शेतकऱ्यांचे नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे समुद्रपूर येथील तहसीलदार यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..

Previous articleबुलढाणा अर्बन बँक व्यवस्थापकाचा मोबाईल बसस्थानकावरुन लंपास
Next articleसिंदखेड राजा शहारातील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये यांच्या जाहीर प्रवेश