Home Breaking News शेगाव बसस्थानकावर नातेवाईकांना सोडविण्यासाठी आलेल्या रोकडिया नगर येथील इसमाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने...

शेगाव बसस्थानकावर नातेवाईकांना सोडविण्यासाठी आलेल्या रोकडिया नगर येथील इसमाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी

124

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

शेगाव येथील बसस्थानकावर गर्दीचा फायदा – घेवून अज्ञात चोरटयाने इसमाच्या खिशातून २४हजार रुपये लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली.

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या रोकडिया नगर परिसरात राहणाऱ्या मधूकर काशीनाथ तायडे (५३) रा. रोकडीया नगर हे नातेवाईकांना सोडण्यासाठी येथील बसस्थानकावर आले होते. यावेळी नातेवाईकांना बसमध्ये बसवून देण्यासाठी तायडे हे गर्दीत घुसले असता

अज्ञात चोरटयाने त्यांच्या खिशातील २४ हजार रुपये काढुन घेतले व तो फरार झाला. याबाबत तायडे यांनी शहर पोस्टेला तक्रर दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३७९ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleमाटरगाव येथील पालकावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ माटरगाव कडकडीत बंद
Next articleकागदपत्र आणायला कवठा तालुका अकोला येथे जाते असे सांगून घरून निघालेल्या १७ वर्षीय विद्यार्थीनीला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे