Home Breaking News कागदपत्र आणायला कवठा तालुका अकोला येथे जाते असे सांगून घरून निघालेल्या १७...

कागदपत्र आणायला कवठा तालुका अकोला येथे जाते असे सांगून घरून निघालेल्या १७ वर्षीय विद्यार्थीनीला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

117

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

एका १७ वर्षीय विद्यार्थीनीला अज्ञाताने पळवून नेल्या – घटना उघडकीस आली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी १७ वर्षीय विद्यार्थीनी ४ ऑगस्ट रोजी कागदपत्र आणाय कवठा ता. अकोला येथे जाते असे तिच्या आईला सांगून घरून निघून गेली. मात्र अल्पवयीन मुलगी परत घरी आलीच नाही.

कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिळाली नाह यामुळे याबाबत मुलीच्या पालकांनी शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली कीआपल्या मुलीला कुणीतरी पळवून नेल्याचे म्हटले आहे. यावरुन पोलिसां अज्ञाताविरुध्द कलम ३६३ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस करीत आहेत

Previous articleशेगाव बसस्थानकावर नातेवाईकांना सोडविण्यासाठी आलेल्या रोकडिया नगर येथील इसमाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी
Next articleसिंदखेड राजा बाजार समिती ची निवडणूक पुढे ढकलली