Home वर्धा देखरेखी शिवाय बगीचा झाला जंगल….शहरातील एकमेव बगीच्याची दैनाअवस्था

देखरेखी शिवाय बगीचा झाला जंगल….शहरातील एकमेव बगीच्याची दैनाअवस्था

78

 

सिंदी रेल्वे ता.४ : असंख्य वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पालिकेच्या शहरात एकमेव बगीच्या कसाबसा अस्तित्वात आला मात्र तो ही वर्षेभर्यातच देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने जंगल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की शंभर वर्षांपूर्वीची नगर परिषद असलेल्या सिंदी रेल्वे शहरात राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे अद्याप पर्यंत एकही बगीच्या अस्तित्वात नोव्हता.

तेव्हा तत्कालीन नगराध्यक्षा डॉ शालीन मुडे यांनी विशेष प्रयत्न करुन पशु वैद्यकीय दवाखान्याची जिल्हा परिषदेच्या मालकीची सहा एकर जागा नगर पालीकेकडे वळती करुन घेतली आणि तेव्हापासूनच येथे बगीच्या बनविण्याचे नियोजन व्होवू लागले मात्र क श्रेणी नगर पालिकेला विकास कामासाठी तेव्हा मिळणारा नीधी हा फार तुटपुंजा असाचा परिणामता इच्छा असुन सुद्धा शहर बगीच्यापासुन वंचित राहले.

यानंतर विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी शहरातील विकासकामासाठी १३ करोड रुपयाचा नीधी मिळवीला आणि बगीच्याचे अनेक वर्षांपासूनचे शहराचे स्वप्न पुर्णत्वास ऐण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र नियोजनाच्या अभावामुळे बगीचा निर्मितीस चक्क पंचवार्षिक वेळ लागला. शिवाय चार ते पाच एकरात असलेला बगीच्या पाच वर्षांत केवळ एक ते दिड एकरच विकसित व्होवु शकला.
बगीच्याचे उद्घाटन व्होवुन वर्षे लोटले मात्र केअर टेकरचा अभाव आणि पालिका प्रशासनाची निष्काळजीपणामुळे बगीच्यात डुकरांचा सर्रास वावर पाहायला मिळतो. आणि आता पावसाळ्यात तर बगीच्या मध्ये गवत वाढुन संपुर्ण बगीच्याच चक्क जंगल झाला आहे.

येथे वयोवृद्ध नागरीक, लहान मुलबाळ, शाळकरी विद्यार्थी, महीला पुरुष आदीची दररोज मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र येथील परिस्थीती आणि व्यवस्था पाहुन हिरमुस होतो. शिवाय वाढलेल्या गवतात सरपटणारे प्राणी जसे साप विंचु आदी चावा घेण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही.
याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ताबडतोब उपाययोजना करावे अशी शहरवासीयांची तसेच परिसरातील रहीवाश्यांची मागणि

Previous articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पवन युवराज पाटील यांची निवड
Next articleयावल येथे गोंडगाव अत्याचार घटनेच्या निषेर्धात व गुन्ह्यातील आरोपीस कठोर शिक्षेच्या मागणीसाठी सर्वधर्मिय व सर्वपक्षीय मुकमोर्चा