प्रतिनिधी अर्जुन कराळे शेगांव
वडीलोपार्जित शेतीला वारसाहक्काने लागलेल्या नांवाप्रमाणे शेती तक्रारदार यांचे वडील व काका यांच्या नांवावर करण्यासाठी, तुकडेबंदी आदेशानुसार शेती नांवावर करण्यासाठी अडचण येत होती.त्यामुळे ती शेती नांवावर होण्यासाठी तक्रारदार यांनी ती शेती नांवावर होण्याकरिता उपविभागीय अधिकारी खामगांव यांचेकडे परवानगी मागण्याकरिता अर्ज केला .
त्या अर्जावरुन उपविभागीय कार्यालय खामगांव यांनी तहसिल कार्यालय शेगांव यांना अहवाल मागीतला होता. सदर अहवाल तहसिल कार्यालय शेगांव येथुन खामगांव येथे पाठविण्यासाठी संदिप अर्जुन दाभाडे ,महसुल सहायक तहसिल कार्यालय शेगांव यांने तक्रारदार यांच्याकडे तिनहजार रुपयाची मागणी केली.
तडजोडी अती अडीचहजार रुपयाची लाच घेताना संदीप अर्जुन दाभाडे वय 46 राहणार कोठारी वाटीका नं.4 मलकापुर ,अकोला जि. अकोला याला तहसिल कार्यालय शेगांव येथे लाच घेतांना बुलढाणा लाचप्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
पोलिस उपअधीक्षक शितल घोगरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक महेश भोसले , सहाय्यक फौजदार शाम भांगे, पोलिस कर्मचारी विलास साखरे,विनोद लोखडे, जगदिश पवार, स्वाती वाणी आदीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.