Home बुलढाणा सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टी पावसामुळे दोन मंडळा मध्ये पिकांचे पंचनामे करून तात्काळ...

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टी पावसामुळे दोन मंडळा मध्ये पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या -मनसेची मागणी

190

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

तालुक्यामध्ये दिनांक 05 व 06 जुलै रोजी दोन दुसरबीड व किनगाव राजा या मंडळा मध्ये ढग फुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या शेतातील माती पूर्ण खरडून गेली आहे फळबागांचे नुकसान झाले आहे तसेच सोयाबिन, कपाशी, चे सुद्धा खूप नुकसान झाले आहे

शेतकऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने पंचनामे करून हेक्टरी 50 रु आर्थिक मदत देण्यात यावी असे ना झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल

अशी मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, जिल्हाउपाध्यक्ष निलेश देवरे, तालुकाध्यक्ष अभिजित देशमुख, विधानसभाअध्यक्ष सिधु गव्हाड, विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष अतिश राजे, शहर अध्यक्ष घनशाम केळकर, गव तहसिदार याना निवेदन देण्यात आले.

Previous articleपी एम किसान सन्मान निधी योजनेचे थकवलेले हप्ते बँक खात्यावर वितरीत करा – स्वाभिमानीची मागणी
Next article२२ ऑगस्ट ला सिंदी नगरवासियांचा चक्का जाम आंदोलन