Home गडचिरोली पंचायत समिती चामोर्शी येथे “मेरी माटी,मेरा देश” उपक्रम उत्साहात साजरा.

पंचायत समिती चामोर्शी येथे “मेरी माटी,मेरा देश” उपक्रम उत्साहात साजरा.

293

आमदार डॉ देवराव होळी यांच्या शुभहस्ते अनावरण.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:- पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विर जवानांनी आपल्या जीवाची बाजी लाऊन आम्हा सर्वांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले.त्यामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत.या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देशात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अभियान मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे.त्या मधीलच एक महत्वपूर्ण भाग म्हणून “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम दिनांक ९ आगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
दरम्यान गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्या शुभहस्ते शिलावरणाचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना शपथ देण्यात आले.पंचप्रण शपथ पुढीलप्रमाणे,
मी अशी शपथ घेतो की,विकसित भारताच्या विकासासाठी माझी भागीदारी प्रामाणिकपणे पार पाडीन,गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.देशाच्या समृद्ध वारशावर अभिमान बाळगिन आणि देशाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन,देशाच्या एकता आणि अखंडते साठी सदैव प्रयत्नशील राहीन.देशाप्रती माझे कर्तव्य आणि जबाबदारीचे मी पालन करीन.देशाच्या प्रतिष्ठेसाठी वीरांच्या कार्यावर प्रेरित होऊन देशाचे रक्षण,सन्मान,आणि प्रगतीसाठी समर्पित राहीन

जय हिंद कार्यक्रमाला पंचायत समिती चामोर्शीचे गट विकास अधिकारी सागर पाटील, सहायक गटविकास अधिकारी भिमराव व्यनखंडे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, शिक्षण विस्तार अधिकारी नेताजी मेश्राम,यशवंत टेंभुर्णे, राजेश कोत्तावार,कृषी विस्तार

अधिकारी काळबांधे,केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,गट साधन केंद्र चामोर्शी येथील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते, विवेक केमेकर,संसाधन शिक्षक रवी खेवले,दशरथ गहाणे,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण,उमेश पोहाणे,शिक्षक वर्ग,पंचायत समिती चामोर्शी येथील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी,महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleकिरकोळ सामान आणायचा आहे असे सांगून शेगाव बस स्थानक येथून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल
Next articleशेगांव ग्रामीण पोलिसांचा वरली जुगारवर छापा, ६ हजार रू चा मुद्देमाल जप्त