Home Breaking News शेगांव ग्रामीण पोलिसांचा वरली जुगारवर छापा, ६ हजार रू चा मुद्देमाल जप्त

शेगांव ग्रामीण पोलिसांचा वरली जुगारवर छापा, ६ हजार रू चा मुद्देमाल जप्त

171

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.तालुक्यातील ग्राम तिंत्रव येथील सुरु असलेल्या वरली जुगार व अवैध दारू विक्रीवर ग्रामीण पोलीसांनी दि.९ ऑगस्ट रोजी दु.४.३० वा छापा मारला असता आरोपी कडुन ६ हजार १७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हकीकत अशा प्रकारे आहे की यातील नमुद घ ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी याचेवर पंचासमक्ष – खबरेप्रमाणे जुगार व प्रोव्ही रेड केला असता आरोपीचे कब्जातुन आकडे लिहलेल्या कार्बनची १ नग कागदी मोठी चिठ्ठी कि. 00/- रु. वरली मटका जुगाराचे नगदी २८० रु एक नग डॉट पेन कि. ५/- रु. एक SAMSUNG कंपनीचा जुना वापरता मोबाईल हैंडसेट ज्याचा IMEI क्र. 350894211465341. ज्यामध्ये जिओ कंपनीच सिमकार्ड क्र. 8767833701 कि. अं. ५ हजार रुपये असा एकुण ५ हजार ,२८५ रुपयांचा जुगार माल तसेच घटनास्थळावरील थैलीची झडतीमध्ये आरोपीचे कब्जातून विनापरवाना ९० एम. एल. च्या एकुण २५ नग बॉटल प्रत्येकी कि ३५ रु प्रमाणे ८७५ रु ची दारु, एक नग वायरची थैली कि. १० रुपये, असा एकुण ८८५ रुपयाचा प्रोव्हीशन माल असा एकुण ६ हजार १७० रुपय जप्ती करुन ताब्यात घेतला

.या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पो.ना. सुधाकर प्रभाकर थोरात वय ३९ वर्ष नेमणुक मा. उप वि.पो. अ. सा. कार्यालय खामगांव यांनी दिलेल्या लेखी रिपोर्टवरुन शेगांव ग्रामीण पोलीसांनी आरोपी – विलास रामदास डोंगरे वर्ष ३२ वर्षे रा आडसुळ ह. मु. तित्रव ता. शेगांव जि. बुलढाणा याचे

विरुद्ध अप.नं १८१/२०२३ कलम १२(अ) मजुका,सह कलम ६५(ई) मदाका अन्वये सदरचा गुन्हा दाखल करुन तपास मा पो नी सा आदेशाने बीट पोहेका अरुण मेटांगे यांचेकडे देण्यात आला आहे

Previous articleपंचायत समिती चामोर्शी येथे “मेरी माटी,मेरा देश” उपक्रम उत्साहात साजरा.
Next articleडॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना “युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका”विषयावर पीएचडी प्रदान