Home बुलढाणा पुरग्रस्त जामोद ग्रामवाशीयांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा.

पुरग्रस्त जामोद ग्रामवाशीयांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा.

405

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव/खेललोन जामोद येथील बेंबळेश्वर नदीवरील मोरिया पुल बांधकामात निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे व चुकिच्या डिझाईन मुळे शेकडो नागरिकांना नुकसानिला सामोरे जावे लागले या नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई मिळण्यासाठी व पुल बांधकाम करणाऱ्या संबधीतांनवर कारवाई करा या मागणीसाठी जामोद ग्रामवाशीयांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सदर पुलाच्या मोऱ्या अतिशय लहान आकाराच्या वापरल्या असल्याने पुराच्या पाण्याने वाहून आलेले झाडे, कचऱ्याने बंद होऊन संपूर्ण खेलशिवापूर व खेललोन या परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले असल्यामुळे घराच्या भिंती पडून घरातील संसारकरिता जीवनाश्यक असणाऱ्या वस्तूंची नासधूस झाली आहे. तर कित्येक लोकांचे अन्नधान्य, गुरे, भांडी कुंडी, इले. उपकरणे ही पुराच्या महाभयंकर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

त्यामुळे त्यांना आजपर्यंत उघड्यावर राहावे लागत आहे तसेच भविष्यात सुद्धा पूर्णपरिस्तिथी निर्माण झाल्यास जिवितहानी होऊ शकते परिणामी शासनाकडून मिळणाऱ्या सानुग्रह लाभापासून जाणीवपूर्वक पूरग्रस्तांना वंचित ठेवल्या गेले आहे.त्यामुळे त्यांचे झालेले नुकसान शासनाने योग्य त्या मापडंदात बसविलेले नाही. वास्तविक या ठिकाणी आर सी सी पूल बांधणे गरजेचे होते मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व स्थानिक ग्रामपंचायतने केवळ भ्रष्टाचाराच्या उद्देशाने सदर मोरीपूल बांधून सर्वसामान्य लोकांची व शासनाची दिशाभूल करून निधी व्यर्थ गमावीला आहे त्यामध्ये फारमोठे नुकसान केले आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर विना विलंब कडक कारवाई करण्यात यावी. व नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई द्यावी. या मागणीसाठी १७/८/२०२३ पासुन जळगाव तहसिल कार्यालयावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसिलदार यांना निवेदनातून दिला आहे.

या वेळी तेजराव लोणे ,असलम खां अली खां, शकील खान अपदूल्हा खान, संजय रजाने, मोतीराम भगत,शे साबीर शे लूकमान,सूबान खा इसमाइल खा, श्री कृष्ण शंकर धुर्डे,जयवंती पवार,मगरुबाइ पवार,,लीयाकत बेग आलम बेग,शे इसूफ शे हमजा ,शे आसिफ शे बब्बू,या वेळेस तसेच लक्षणीय आदिवासी महीला उपस्थित होत्या..

Previous articleआपली मायी आणि मातीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असावाच….! आमदार समीर कुणावार
Next articleसमृद्धी महामार्गावर देऊळगाव कोळ जवळ कार पलटी होऊन दोन गंभीर