Home वर्धा आहे का तांदुळ ? तांदुळ आहे का तांदुळ ?

आहे का तांदुळ ? तांदुळ आहे का तांदुळ ?

235

 

राशनच्या तांदळाने भरलेला अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त

सिंदी रेल्वे ता.१३ : लगतच्या समृद्धी महामार्गावर सिंदी रेल्वे पोलिसांनी नाकाबंदी करुन ट्रक क्रमांक एम एच ४० सि डी ६७०९ या वाहनात ६४४ कट्टे भरलेला २५७ क्विंटल तांदुळ ज्याची किमंत ९२५२००/- रुपयाच्या राशनच्या तांदुळाची अवैधरित्या वाहतूक करतांना रविवारी (ता.१३) जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,

आहे का तांदुळ ? तांदुळ आहे का तांदुळ ? अशी हाक आरोरी प्रत्येक गल्लीबोळातुन दररोज ऐकु येते. चारचाकी वाहन घेऊन बाहेरुन ऐणारे शहरातील राशन धारक कृटुबांकडुन चड्या दराने सर्रास राशन मालाची खरेदी होत असते आणि हाच गल्लीबोळातुन जमा झालेला राशनचा तांदुळ……

तांदुळ माफीया विकत घेऊन मोठ्या खरेदीदाराला पुरवठा करतो मागील कोरोना काळात दोन वर्षांपासून हा व्यवसाय शासकीय यंत्रनेच्या आशिर्वादाने चांगलाच फलाफुलास आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारावर सिंदी रेल्वे पोलिसानी समृर्ध्दी महामार्गावर नाकाबंदी करुन ट्रक क्रमांक एम एच ४० सि डी ६७०९ या वाहनास थाबवुन विचारपुस केली असता वाहन चालक पवन चारमोडे याने वाहनात चना असल्याचे सागुन चन्याचे बिल दाखविल्याने नमुद वाहनाची तपासणी केली असता वाहनात चुगड्यात तांदुळ भरुन मिळुन आल्याने वाहन चालकास तांदळा बाबत विचपुस केली असता तांदळा बाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर केले नाही़.

वरुन आरोपी व ट्रक ताब्यात घेतला असता ट्रक मध्ये ६४४ कट्टे भरलेला २५७ क्विंटल तांदुळ ज्याची किमंत ९२५२००/- रुपये आणि ट्रक किमत २५०००००/-रुपये एकुन ३४२५२००/-रुपयाच्या राशनच्या तांदुळाची अवैधरित्या वाहतूक करतांना रविवारी (ता.१३) जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला

.गुन्हयाचा तपास सह पोलीस निरीक्षक वंदना सोनुने ठाणेदार पोस्टे सिदी रेल्वे करत असुन राशन धान्याची काळाबाजारी करणारे मोठे राॅकेट उघडकीस येवुन राशन माफीया गळास लागण्याची शक्यता आहे. मात्र शहरात दुधाच्या चुकार्यातुन सापडलेल्या पाचशेच्या जाली नोटाचा तपास जसा नागपुरातील हल्लदीराम पर्यंत जाऊन थांबला होता तस होता कामा नये. अशी सिंदीवासीयांत चर्चा आहे.

 

Previous articleसमृद्धी महामार्गावर देऊळगाव कोळ जवळ कार पलटी होऊन दोन गंभीर
Next articleजिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एस टी महामंडळा चा ठेंगा कमकुवत पुलावरून बसेस सुरु