Home जळगाव चुंचाळे रस्त्यासाठी आज डी.एम.पाटील यांनी केले भव्य रस्ता रोको आंदोलन लिखित आश्वासनानंतर...

चुंचाळे रस्त्यासाठी आज डी.एम.पाटील यांनी केले भव्य रस्ता रोको आंदोलन लिखित आश्वासनानंतर आंदोलन मागे

297

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

-चुंचाळे गाव ते चुंचाळे फाटा रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय व बिकट झालेली आहे सदर रस्ता नागरिकांच्या वापरासाठी धोकेदायक बनला आहे तरी सदर रस्ता तात्काळ दुरुस्तीसाठी चुंचाळे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील डी एम पाटील यांनी जळगाव कलेक्टर व संबंधित प्रशासनास लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती व रस्त्याचे काम वेळेत न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता मात्र दिलेल्या मुदतीत संबंधित विभागाकडून कुठलीच अशी ठोस कारवाई न झाल्याने आज दि.१५ आँगष्ट रोजी सदर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले

याबाबत सविस्तर असे की, दि.२०/७/२०२३ रोजी जळगाव जिल्हा कलेक्टर यांना यावल तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी यांना डी एम पाटील यांनी भेटून चुंचाळेगाव ते चुंचाळे फाटा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था बघून दुरुस्तीची मागणी केली होती.सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने रस्ता खराब आहे व त्यामळे सर्व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अश्या या नादुरुस्त रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी चुंचाळे येथील डी एम पाटील यांनी लावून धरली मात्र झोपलेले प्रशासन काही जागे झाले नाही व काही कार्यवाही करण्यात प्रशासन अपयशी ठरले परंतु प्रशासन जरी झोपलेले असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील प्रशासनाला जागं करेल कारण इथं प्रश्न नागरिकांच्या जीवाचा आहे अशी

आक्रमक भूमिका घेत दिनांक १५ आँगष्ट रोजी चुंचाळे फाट्यावर आंदोलन सुरू करण्यात आले गावकरी व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दिल्याने डी एम पाटील यांनी आभार मानले

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तडवी साहेब यांनी दिले लेखी स्वरूपात आश्वासन संदर्भ पत्र क्र. ५ नुसार कळविण्यात येत आहे की पावसाळा संपल्यावर दिनांक २६/१०/२०२३ नंतर सदर काम सुरु करण्यात येईल. तरी आपण दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी करीत असलेले रास्ता रोको आंदोलन स्थगीत करावे व या कार्यालयास सहकार्य करावे

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तडवी साहेब यांनी असे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास दिनांक २७/१०/२०२३ रोजी परत याचं रस्त्यावर उग्र व तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल यांची नोंद संबंधित अधिकारी यांनी घ्यावी असे चुंचाळे येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले यावेळी
सरपंच प्रतिनिधी, मुबारक छबु तडवी, माजी सरपंच नत्थु रमजान तडवी, वि. का. व्हा. चेअरमन ईस्माईल तडवी, माजी सरपंच दगडु तडवी, भाजप सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, वि. का. सो. संचालक, नानाबापु, रवींद्र पाटील,समाधान निळे, शिवाजी गजरे शिवसेना ता. अध्यक्ष रविंद्र सोनवणे,रोहिदास महाजन, रमेश लिंगायत, किनगांव, (ऊ.बा.ठा) बोराळे माजी उपसरपंच भिमराव वानखेडे चुंचाळे योगेश पाटील, रविंद्र सोनवणे,सुपडु संदानशिव,राजु वानखेडे , सुकलाल पाटील. साहेबराव पाटील. युवराज पाटील. संदीप पंडित यांच्या सह अनेक ग्रामस्थ हजर होते.

Previous articleस्वतंत्र दिनाचे औचित्य साधून फ्री क्लास मध्ये शिक्षण घेणाऱ्या ३४ मुलांना केले शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप.
Next articleअकोला सिटी कोतवाली पो.स्टेशन मध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचारीने केली गळफास घेऊन आत्महत्या