Home वर्धा अतुलनिय कार्यासाठी अतुल सन्मानितप-त्रकार संघाने केला भव्य सत्कार

अतुलनिय कार्यासाठी अतुल सन्मानितप-त्रकार संघाने केला भव्य सत्कार

288

 

सिंदी रेल्वे ता.१७ :शहरातील अतुल दामोधरराव बेलखोडे यानी रक्तदानाचे अर्धशतक करुन अनेक कृटुबांची, अनेक पेंशन्टची गरजेच्या वेळी महत्त्वाची मदत करुन मदत आणि सेवाभावाचे अर्धशतक पुर्ण केल्याबदलच्या त्यांचा अतुलनिय कार्याची दखल घेत स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने स्वतंत्राच्या झेंडावंदन प्रसंगी भव्य सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील बुलढाणा अर्बन बँकेत कार्यरत असलेले पन्नास वर्षीय अतुल बेलखोडे यांनी तब्बल ५१ वेळा रक्त दान करुन अनेक पेंशन्टची आणि कुटुंबाची गरजेच्या वेळी भरीव मदत केली आहे शिवाय रक्तदानबाबत समज गैरसमज दुर करुन ५१ वेळा स्वतः रक्तदान करुन आपल्या कृतीतुन अनेकांना या महान कार्यास प्रवृत्त केले आहे.

अतुल बेलखोडे यांच्या या अतुनीय कार्याची दखल रक्तदान सारख्या महान कामात शहरातील तरुनांनी समोर यावे यासाठी ७७ व्या स्वतंत्र दिनानिमित्त बाजार चौकातील सर्वपक्षीय झेंडा वंदन प्रसंगी सिंदी रेल्वे पत्रकार संघाच्या वतीने अतुल बेलखोडे यांचा शाल श्रीफळ आणि मोमेंटो तसेच गुणगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद छाजेड सचिव बबलू खान, सन्मानित सदस्य मोहन सुरकार, ओमप्रकाश राठी, अमोल सोनटक्के, गुड्डू क्युरेशी, प्रशांत कलोडे, प्रशांत बोरीकर आदीची प्रमुख उपस्थीती होती.

सिंदी रेल्वे पत्रकार संघा तर्फे बेलखोडे यांचा सत्कार करताना

Previous articleकर्तव्यदक्ष लाईनमनची बदली रदद करा…गांधी चौक विचार मंचची निवेदणातुन मागणी
Next articleपत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी करा शेगावात पत्रकारांची तहसील समोर निदर्शने