Home Breaking News स्पर्धा परीक्षा शुल्क वाढी विरोधात,जंगली रमी विरोधात मानवहित रस्त्यावर येणार

स्पर्धा परीक्षा शुल्क वाढी विरोधात,जंगली रमी विरोधात मानवहित रस्त्यावर येणार

159

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

मानवहित लोकशाही पक्ष बुलढाणा जिल्हा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन स्पर्धा परीक्षा ची वाढलेली परीक्षा शुल्क कमी करावी व सोशल मीडियावर प्रत्येक व्हिडिओ वर येणाऱ्या तीन पत्ती,जंगली रमी, माय 11सर्कल आणि येणाऱ्या अस्लील जाहिराती बंद करण्यात याव्या ही मागणी केली.

त्यावेळी नागेश्वर पाटेकर म्हणाले या महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर हा आपल्या रक्ताच पाणी करतो आपल्या मुलांना सुशिक्षित करून स्पर्धा परीक्षांसाठी तयार करतो चांगल्या स्पर्धा परीक्षेच्या क्लास साठी त्याच्याजवळ 50 हजार तर सोडा फडणवीस साहेब दहा हजार सुद्धा नसतात.

म्हणून त्या विद्यार्थ्यांचा बाप एक मोबाईल घेऊन देतो की ऑनलाईन द्वारे ते क्लास फ्री असतात पण काही नालायक क्रिकेटर चित्रपटातील कलावंत त्यांना तीन पत्ती आणि रमी खेळायचं सांगतात तर काही जाहिराती ह्या अश्लील व्हिडिओ दाखवून तो इंस्टॉल करायचं सांगतात आणि त्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते त्यासाठी या शासन आणि प्रशासनाला माझी विनंती आहे

की ह्या फालतू लोकांच्या जाहिराती बंद कराव्या व परीक्षा शुल्क कमी करावा अन्यथा मानवहीत लोकशाही पक्ष रस्त्यावर उतरेल व तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन करे अशी मागणी आणि आवाहन मानवहित लोकशाही पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश्वर पाटेकर यांनी केले

Previous articleयावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज रंगेहात अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Next articleरक्ताची कमतरता रक्तदानानेच दूर होऊ शकते – जिल्हाध्यक्ष किरण लंगोटे ..शिबिरात महिलांनीही केले उस्फूर्तपणे रक्तदान.