Home जळगाव किनगाव प्रथमिक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत अतिसंवेदनशील गावातील भागात आरोग्य तपासणी पथकाकडुन डेंगू...

किनगाव प्रथमिक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत अतिसंवेदनशील गावातील भागात आरोग्य तपासणी पथकाकडुन डेंगू विरोधी मोहीम सुरू

115

 

यावल ( प्रतिनीधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत उपकेंद्र किनगाव बुद्रुक,किनगाव खुर्द व डांभुर्णी येथे अति संवेदनशील भागात डेंगू विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. किनगाव तालुका यावल या

प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या मोहीमेव्दारे गावात डेंगू ताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण ,हस्त पत्रिका वाटणेसह गाव पातळीवर डेंगू तापाची लक्षणे, उपचार,डेंगूताप प्रतिरोधक उपाययोजनाबद्दल माहिती ग्रामीण पातळीवरील नागरिकांना देण्यात येत आहे

तर नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाड्या बसवणे,शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसवणे घरासमोर पाणी साचू न देणे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे तसेच रात्री झोपताना मच्छरदाणी लावून झोपणे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे

या मोहीमेतआरोग्य सहाय्यक आर. आर. सुरवाडे,आरोग्य सेवक जे. के. सोनवणे,डी.एम.बरडे,पी.जी. काळे, एम.बी.बारेला किनगाव बुद्रुक येथील आशा वर्कर निराशा जाधव, रेखा पाटील,आशा भालेराव, दिपीका पाटील,धनश्री वाघुळदे सुनिता पाटील,मीना साळुंखे किनगाव खुर्द येथीलआशावर्कर जयमाला अडकमोल, दुर्गा तायडे,सायरा तडवी डांभुर्णी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सोनल भंगाळे आशा वर्कर छाया कोळी,रेखा कोळी,सायरा तडवी,पुनम सनेर व ममता कोळी यांचे सहकार्य लाभत आहे.

Previous articleमुंबईतील होमगार्ड सैनिकांचे राज्यव्यापी साखळी उपोषणात तालुक्यातील होमगार्ड सहभागी
Next articleकिनगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन