Home जळगाव किनगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

किनगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

184

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल – किनगांव तालुका यावल येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन दि.25/08/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

सर्वप्रथम गावातील
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन सदर शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवा प्रदेश सदस्या शमिभा पाटिल, जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,कामगार आघाडी यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे,संतोष तायडे,रोहन निकम,दिलीप भालेराव,मेजर देवदत्त मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले, वंचित बहुजन समाजाला आपला विकास करून घ्यायचा असेल तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे. तसेच इतर मान्यवरांची भाषणे झाली.

बहुजन समाजातील वंचित घटकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मूळ प्रवाहात आणून त्यांच्या अडीअडचणी सोडवून सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पक्षाची ध्येय धोरणे व प्रचार आणि प्रचार किनगाव गावातील घराघरापर्यंत पोहोचविला जाईल असे इतर मान्यवर पदाधिकारी यांनी सांगितले.आभार प्रदर्शन यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी केले.व सुत्रसंचालन संतोष तायडे यानी केले कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष रोहन निकम,सचिव बुध्दभुषन तायडे, शाखा अध्यक्ष भुषण भालेराव,अमोल भालेराव,रोहित वानखेडे,अशोक साळुंके,मनोज सोनवणे,सल्लागार : योगेश दत्तात्रय भालेराव, गणेश दिलीप साळुंखे, अजय तडवी, प्रथम कोळी, महेंद्र अडकमोल, राजेश पाटील, शरीफ तडवी, सुखदेव साळखे, सुरेश भोई, भूषण कोळी, विवेक तायडे, विनोद मोरे, गणेश दामु साळुंखे,

अशोक साळुंखे, शरीफ हबीब तडवी, पंकज साळुंखे, प्रेम सोनवणे, विशाल तायडे, सुपडू साळुंखे, विकास कुंभार, चेतन भालेराव, वैभव सोनवणे, महेंद्र सोनवणे, अमोल, सोनवणे, शिलवाल अडकमोल, राजेश सोनवणे, प्रशिक अडकमोल, सम्यक मेढे, राज वानखेडे, संदेश तायडे, संजय अडकमोल, अक्षय साळुंखे, संजय भालेराव, किरण सुरेश सोनवणे, नाना साळुंखे, अभिजीत साळुंखे, सागर भालेराव, गौतम सपकाळे, तुषार भालेराव, ललित कोळी, शशिकांत भालेराव, दिपक सोनवणे, बाळु झाल्टे, गोविंदा साळुंखे, देवा बाविस्कर, दिपक भालेराव, अजय भोई, मनोज तायडे, रुषिकेश निकम, योगेश भोई, विनोद अडकमोल, देवानंद सपकाळे, प्रसन्नजीत सोनवणे, विजय भोई, करीम तडवी, यासीन तडवी, शाहरुख तडवी, विशाल साळुंखे, मुकुंदा साळुंखे, भानुदास महाजन, पप्पु बाविस्कर, शामराव तायडे सह गावातिल व तालुक्यातिल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleकिनगाव प्रथमिक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत अतिसंवेदनशील गावातील भागात आरोग्य तपासणी पथकाकडुन डेंगू विरोधी मोहीम सुरू
Next articleतक्षशिला बुद्ध विहार शेगाव येथे धम्म संस्कार वर्ग शिबिर संपन्न