Home Breaking News डॉक्टरच बनला मृत्यूचे कारण ,चुकीच्या उपचाराने निष्पाप बळी , कार्यवाहीची मागणी

डॉक्टरच बनला मृत्यूचे कारण ,चुकीच्या उपचाराने निष्पाप बळी , कार्यवाहीची मागणी

467

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली गावात अनेक दिवसापासुन आपली दुकानचालवणाऱ्या एका बोगस डॉक्टराकडुन चुकीच्या उपचारा पध्दतीमुळे एक महिलेचा दुदैवी मृत्यु झाल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे .

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , कोरपावली तालुका यावल या गावात गेल्या तिन ते चार वर्षापासुन विद्युत विश्वास राय नामक एका बंगाली कथित डॉक्टरांने आपला दवाखाना उघडला होता ,या बोगस डॉक्टराच्या विरुद्ध यावल तालुका डॉक्टर असोसिएशन पासुन तर गावातील लोकनियुक्त सरपंच विलास अडकमोल यांनी वारंवार या बोगस डॉक्टराचा दवाखाना तालुका आरोग्य यंत्रणेने बंद करावा

अशी लिखित तक्रार केली होती , दरम्यान आरोग्य विभागाने या संदर्भात थातुरमातुर चौकशीच्या पलीकडे काहीच केले नाही . त्यामुळे या बोगस डॉक्टराचा दवाखाना राजरोसपणे सुरूच होता , अखेर परिणामी आज या बोगस डॉक्टराकडे उपचार घेणाऱ्या एका ४० वर्षीय आदिवासी महिलेचा चुकीच्या उपचारामुळे दुदैवी मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला.

असुन, दरम्यान त्या बोगस डॉक्टराकडे सदरच्या महिलेचा उपचार सुरु होता पण उपचार सुरू असतांना सदर या बोगस डॉक्टराकड्रन चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन लगावले गेल्याने तिचा पायावर विपरीत परिणाम झाले , व त्या महिलेचा मृत्यु झाल्याचे या बोगस डॉक्टराच्या लक्षात आल्याने डॉक्टराने आज दिनांक २९ऑगस्ट रोजीच सकाळीच गावातुन पळ काढले आहे .

या बाबत ची अधिक माहिती घेण्यासाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या संदर्भातील घटनेची त्वरित सखोल चौकशी करून या आदीवासी महिलेच्या मरणास जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरूद्ध योग्य प्रकारची कडक कारवाई करू असे सांगीतले आहे .

Previous articleपोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक
Next articleमहाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा रेखाताई खेडेकर यांची राज्यपालाकडे मागणी