Home जळगाव कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे महीला मरण पावली आरोग्य प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर...

कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे महीला मरण पावली आरोग्य प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी : वैद्यकीय व्यवसायिकांची मागणी

206

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली गावात बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे एका आदिवासी महीलेच्या झालेल्या दुदैवी मृत्युच्या पाश्वभुमीवर यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायीकांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यावल यांना कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे . या निवेदनात त्यांनी म्हटले आहे

की यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक गावात बोगस डॉक्टर मुन्नाभाईनी आपली दुकाने उघडली असुन ,त्याचा चुकीच्या उपचारामुळे रूग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतअसुन प्रसंगी काही लोकांना आपल्या जिवाशी मुकावे लागत असुन अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी व कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या चुकीच्या उपचारामुळे दुदैवीरित्या मरण पावलेल्या त्या आदिवासी महिलेच्या प्रकरणात अद्याप पर्यंतआरोग्य प्रशासनाच्या वतीने कुठली ही कारवाई झालेली दिसत नाही,

आदिवासी महिलेस न्याय मिळावा अशा मागणी निवेदन यावल तालुका वैद्यकीय व्यवसायीकांच्या वतीने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांच्या कडे केली आहे .

यावेळी बोगस डॉक्टरांवर त्वरीत कारवाई व्हावी यासाठीचे निवेदन देतांना डॉ कुंदन फेगडे ,डॉ धिरज पाटील , डॉ . धिरज चौधरी ,डॉ.अमित तडवी,डॉ.दिपक चौधरी,डॉ.ईसरार खान,डॉ रमेश पाचपोळे,डॉ.अभय रावते,डॉ सतिषअस्वार,डॉ पद्दमानभन देशपांडे,डॉ बि.के.बारी , डॉ सरफराज तडवी ,डॉ गौरव धांडे ,डॉ दाऊद खान डॉ तुषार सोनवणे ,डॉ अमोल महाजन डॉ युवराज चोपडे,डॉमनोहर महाजन , डॉ हरीष महाजन,डॉ चंद्रकांत चौधरी यांच्यासह आदी डॉक्टरांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत .

Previous articleमहाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा रेखाताई खेडेकर यांची राज्यपालाकडे मागणी
Next articleकर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा जीवे मारण्याची धमकी वाळू तस्करांच्या मुसक्या केव्हा आणि कोण अवळणार ?