Home बुलढाणा मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी..

मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी..

68

 

अन्यथा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही.. अँड सतीशचंद्र रोठे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करना-या उपोषणकर्त्या सहिष्णु मराठा समाज बांधवांवर झालेला लाठी चार्ज घृणास्पद षडयंत्राचा भाग आहे.सदर घटना निंदनीय असून उपोषणकर्त्या मराठा समाज बांधवांवर झालेला अमानुष लाठी चार्ज राजकीय पोळी शिजविण्यासाठी खेळलेली मोठी खेळी आहे.

सदर प्रकरण शांततेच्या मार्गाने हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करना-या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून बाळाचा वापर केला जात असेल तर याहून मोठी लोकशाहीची हत्या कोणतीच नाही.

सदर घटनेचा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून सरकारने त्वरित सदर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही.
अशी प्रतिक्रिया आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज जाहीर केली आहे.
_______________

Previous articleभारत राष्ट्र समिती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी भैय्यासाहेब पाटील यांची निवड..
Next articleडिजिटल मिडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद खंडारे यांची निवड जाहीर!