Home Breaking News परसाडे गावातील एका विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

परसाडे गावातील एका विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

668

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील परसाडे गावातील एका विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संजना आमीन तडवी (वय-२१, रा. परसाडे ता. यावल) या विवाहित तरुणीने रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना आपल्या राहत्या घरात एकटी असताना छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी विवाहीतेच्या मृतदेहाचे शिवविच्छेदन केले. दरम्यान या विवाहीत तरूणीने आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही .

Previous articleडिजिटल मिडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद खंडारे यांची निवड जाहीर!
Next articleयावल येथे सकल मराठा समाजाच्या तर्फे  सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या निर्दयी लाठीमारचा जाहीर निषेध