शेगावात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व्हॉलीबॉल, कबड्डी व रनिंग मध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग ( Shegaonnews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद महाविद्यालय येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने शेगावात २९ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कबड्डी, हॉलीबॉल, १०० मीटर धावणे, मुले – मुली ह्या स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य विजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. त्यामध्ये हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल यांनी पटकावला तर

कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद महाविद्यालय यांनी पटकावला. १०० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक ऋतुजा गोपाल इंगळे या खेळाडूंनी पटकावला तर मुलांमध्ये अजय संतोष नागरगोजे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला सदर स्पर्धेमध्ये पंच म्हणून क्रीडा शिक्षक पुंजाजी कोल्हे, शेखर खराटे, राजेश गवई यांनी काम पाहले.

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पाहणी करून मदत देण्याची मागणी ( vashimnews )

क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी केले होते.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Shegaonnews:यावेळी शिक्षक शितलकुमार वासनिक, श्रीकृष्ण वाघ, वर्षा पिंपळकार, बोबटकर मॅडम यांच्यासह युवक युवती खेळाडू उपस्थित होते.

Leave a Comment