Yaval/यावल येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 

अनुलोम सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सुरेश भाऊ नेटके, भूषण चव्हाण सर ,युवराज मोरे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर
डॉ. कुंदन फेगडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडले.

दीड दिवसाच्या शालेय शिक्षणावर 35 कादंबऱ्या, 8 पटकथा,3 नाटके 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 1 प्रवासवर्णन, 12 उपहासात्मक लेख लिहून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांना अण्णांनी वाचा फोडली आणि न्याय मिळवून दिला. रशियाच्या लाल चौकात जाऊन शिवरायांचे पोवाडे गाऊन शिवरायांचा इतिहास व स्टॅलिन चा पोवाडा गायला. त्याच रशियात दि 14 सप्टेंबर 2022 रोजी मॉस्को शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.हा एक ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदविला गेला.त्यानिमित्ताने सामाजिक संस्था अनुलोमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत, म्हणुन संस्थेचे विशेष आभार.
तसेच रशिया येथिल
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळाच्या ऐतिहासिक क्षणाची कायम स्मृती राहील ” असे मनोगत डॉ कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीच्या घरात ह्या अद्वितीय घटनेची चिरकाल आठवण राहावी म्हणून चित्ररूपी फ्रेम प्रत्येक कुटुंबाला सप्रेम भेट देण्यात आली.या वेळी अनुलोम संस्थेचे तुषार महाजन,सुरेश नेटके, भूषण चव्हाण सर, युवराज मोरे,प्रदीप पारधे, विकास मोरे, प्रकाश चंदनशिव, प्रेम मोरे,विजय निकाळजे आदी उपस्थित होते

Yaval

Leave a Comment