रोटरी क्लब अकोला ऍग्रोसिटी च्या वतीने श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
319

 

अकोला प्रतिनिधी अशोक भाकरे

वृक्षारोपण पर्यावरणाचे संवर्धन व समतोल राखण्याकरिता समाजाचे दायित्व- प्रा नितीन बाठे

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटी च्या वतीने श्री समर्थ पब्लिक स्कूल,रिधोरा रोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे हे होते सोबत रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचे अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड, सचिव नीरज देशमुख व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आयुर्वेदात उपयोगी असलेल्या विविध वृक्षांची लागवड या वृक्षारोपण कार्यक्रमात करण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राध्यापक नितीन बाठे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी ही आपल्या पिढीवर असून येणाऱ्या पिढीला आपण एक स्वच्छ व निर्मळ वातावरण देणे हे आपले कर्तव्य असून या कार्यात नव्या पिढीने उत्साहाने भाग घ्यावा असे प्रतिपादन केले

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचे अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी” या तुकोबा रायांच्या अभंगाला स्मरून वृक्ष हे मनुष्याचे मित्र असून पर्यावरणाचा रास रोखण्याकरिता वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे व रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला व नव्या पिढीला पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्याचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेणार असल्याचे कळवले.

रोटरी क्लबचे सदस्य मयूर देशमुख यांनी सर्व उपस्थितांना वृक्षांच्या विविध प्रजाती व वनौषधी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

रोटरी क्लब ऑफ अकोला ऍग्रोसिटीचे पर्यावरण समितीचे अध्यक्ष विवेक झापर्डे यांनी क्लबच्यावतीने दुर्गम भागात व जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये जाऊन वृक्षारोपण करण्याचा व वृक्ष संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांना सोबत जोडण्याचा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट अतुल चौधरी, एडवोकेट आनंद गोदे,डॉ ज्ञानसागर भोकरे ,गुणवंत देशपांडे, सुनील घोडके , एडवोकेट राजेश अकोटकर ,नारायण कळमकर, सोमेश्वर रत्नपारखी, एडवोकेट संतोष पाटील, राजेश राऊत, शशांक जोशी, आशिष धाडे ,अमित कोल्हटकर, संगीता चौधरी, अर्चना पाटील, अश्विनी भोकरे, संपदा जोशी, दिपाली रत्नपारखी, सुनीता देशपांडे, प्रेरणा घोडके, संध्या अकोटकर, ज्योती कळमकर,मुक्ता धाडे, अभिजीत कडू, अभिजीत आखरे आनंद थोटांगे, आशिष वानखडे, सागर जोशी, विधीश साकरकार, मंदार वखरे ,अमोल बोचे, डॉ पार्थ गवात्रे, गणेश सारसे, श्रीकांत हांडे, जितेंद्र देशमुख, कौशल वानखडे, राहुल केकान ,डॉ सौरभ बोराखडे, वैभव मेहरे, विवेक झापर्डे ,वसंत खराडे, राज ईश्वरकर, दीपक वानखडे, दिलीप देशमुख,अनंता ठाकरे, मयूर देशमुख, तुषार मुर्हेकर,श्रीकांत देशमुख, प्रसाद देशमुख हे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते

या कार्यक्रमाला श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांचा विशेष सहयोग लाभला

कार्यक्रमाचे संचालन सचिव नीरज देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन कौशल वानखडे, जितेंद्र देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here