तेली समाज राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

0
288

 

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील तेली समाज बांधवांच्या वतीने 19 डिसेंबर 2021 वार रविवारला सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार म्हणजे लग्न . परंतु बदलत्या परिस्थितीनुसार व गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लग्न जुळविणे कठीण झाले आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा वेळ, श्रम ,पैसा वाचावा या उद्देशाने तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा श्री विष्णूपंत जी मेहरे यांच्या अध्यक्षतेत व माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे (जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ ) यांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार आहे .मेळाव्याला उद्घाटक म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार ,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदाजी तडस राहणार आहेत. सोबतच युवक व युवतींना मार्गदर्शन करण्याकरिता सौ मोनिकाताई उमक अमरावती यांच्या व्याख्यानाचे सुद्धा आयोजन केले आहे . वेळेचे महत्त्व ओळखत बौद्धिक देणारा हा मेळावा वधू- वरांसाठी मोफत आहे. त्यामुळे वधू-वरांच्या पालकांनी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष नंदकिशोर काथोटे, स्वागताध्यक्ष अभिमन्यू भगत ,सचिव श्याम पांडव, खजिनदार संजय चोपडे, उपाध्यक्ष गणेश जामोदे, सहसचिव रमेश आकोटकर, प्रचार समिती प्रमुख अनिल भगत , विनोद चिपडे व आयोजक मंडळींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here