Home Breaking News सावंगी तलाव-पाहेगाव चौफुली ते नेर-पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दिनांक ०७/११/२०२२...

सावंगी तलाव-पाहेगाव चौफुली ते नेर-पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दिनांक ०७/११/२०२२ रोजी सोमवारी १२ वाजता निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन:

0
224

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी नागरिकांची दिवसेंदिवस मागणी होत आहे.तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे जाणून-बुजून दुर्लक्ष होत असून,आता परिसरातील नागरिकांनीच जन आंदोलन करण्याची ठरवले आहे.बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. की काय अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.तसेच मागील बऱ्याच दिवसापासून सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर व पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्ड्यामध्ये पाणीच पाणी साचले आहे.तसेच ऐजा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच एसटी बस सेवा मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे.सदर ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवासांना व खाजगी वाहनांना जास्त प्रमाणात प्रवाशी भाडा द्यावा लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील ऐजा करणारे नागरिकांना व वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होत असून,याचा नाहक भुर्दंड त्यांना सोसावं लागत आहे.या रस्त्यावरुन दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना विलंब लागत असल्यामुळे अनेकांना आपलं जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार म्हणावे लागतील.त्यामुळे या भागातील रस्त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती व डाग-डुगी करावी व नवीन व सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे.अशी मागणी मानेगाव व मौजपुरी सर्कल तसेच जालना तालुका ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने होत आहे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल.तसेच
या रस्त्यासाठी दिनांक ०७/११/२०२२ रोजी सोमवारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन देण्यात येणार आहेत.तरी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here