अट्रावल सांगवी शिवारातून बैल चोरणाऱ्यास रंगेहात पकडले; यावल पोलीसात गुन्हा दाखल

0
1463

 

यावल ( प्रतिनिधि) विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना किरण दिनकर कोळी रा. अट्रावल याला शेतकऱ्याने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी ४.३० वाजता यावल पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, चंद्रकांत विजय तावडे (वय-३५) रा. डोंगर सांगवी ता. यावल हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बैलजोडी आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचा २० हजार रूपये किंमतीचा बैल अट्रावल सांगवी शिवारातील शेतात बांधले होते. अट्रावल गावातील किरण दिनकर कोळी याने बांधलेला बैल चोरून नेत असतांना त्याला रंगेहात पकडले आहे. शेतकऱ्यांनी त्याला चांगला चोप देवून यावल पोलीसांच्या हवाली केले आहे. चंद्रकांत तावडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता अटक केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक जवरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here