निलंगा/ प्रतिनिधी दगडू पिंगळे
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर येथे आज सकाळी वरिष्ठ अधिकारी सहकार्यांसह जाऊन, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, ग्रामस्थ, शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा दिला .
अपघातग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याच्या परिभाषेत बसणारे हे अभूतपूर्व संकट असल्यामुळे शासन त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करील अशी ग्वाही दिली. नदीकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी असे निर्देश याप्रसंगी दिले आहेत.






