अनिल जवादे यांच्या नेतृत्वात शाळा पूर्वरत व नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

0
364

 

दि.9 ऑगस्ट
हिंगणघाट – कोरोणाच्या प्रादुर्भावामुवे गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे मानसिक संतूलन बिघडत चालले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शाळा पूर्वरत सूरू कराव्यात.तसेच केंद्र सरकारने जाहिर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे गरीबांना शिक्षणापासून वंचीत ठेवणारे असल्यामुळे ते रद्द करावे यासाठी भारतीय सविंधान जागृती अभियान आणि विदर्भ राज्य विकास आघाडीचे अध्यक्ष श्री.अनिल जवादे यांच्या नेतृत्वाखाली डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी पालक संघ आणि विदर्भ राज्य विकास आघाडी व भारतीय संविधान जागृती अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री,अनिल जवादे यांनी आपल्या मनोगतातून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे दिड वर्षापासून शाळाँना कुलूप आहे..आॕनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे निट आकलन होत नाही..अनेकांकडे अध्यावत मोबाईल नसल्यामुळे तसेच ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.आॕनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना आपले भवितव्य दिसत नसल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य निट राखण्याच्या योग्य त्या उपाय योजना करून त्यांच्या उज्वलभवितव्यासाठी शाळा सुरू करणे गरजेचे आहे.तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे संविधानातील समता ,न्याय या मुल्यांविरोधी भूमिका घेणारे असून खाजगिकरणाला बळ देणारे, शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे,गरीब आणि श्रीमंत आसे दरी निर्माण करणारे विषमतावादी धोरण आहे.य्यामुळे हे धोरण रद्द करावे समान शिक्षणाचा कायदा तयार करावा असे विचार व्यक्त केले.यावेळी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष श्री किशोर मुटे ,विद्यार्थी पालक संघाचे सर्व पदाधिकारी भारतीय संविधान जागृती अभियान आणि विदर्भ राज्य विकास आघाडीचे पदाधिकारी श्री.गोरख भगत ,श्री.महेश माकडे,श्री.दिनेश वाघ ,श्री.गोपाल मांडवकर इत्यादी आणि बहुसंख्येने विद्यार्थ्यांच्या पालकांची या धडक मोर्चात उपस्थिती होती.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here