अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांनी केली महसुल अधिकार्याना व धक्काबुक्की तर तलाठीयांना अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी…

0
560

 

नांदुरा( प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

दिनांक 29 मार्च 2021 रोजी सकाळी अकराच्या दरम्यान कोदरखेड तालुका नांदुरा येथील पूर्णा नदी पात्रात अवैध रेती या गौण खनिजाची वाहतूक उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली, असता मोक्याच्या ठिकाणी तहसीलदार राहुल तायडे नांदुरा मंडळ अधिकारी अनिल जोशी तलाठी अभिजीत आमले गेले असता त्या ठिकाणी कोदरखेड नदीपात्रात महेश पाटील ट्रॅक्टर ड्रायव्हर राहणार दादुलगाव तालुका जळगाव जामोद हे ट्रॅक्टर व मजुरा सह रेती या गौण खनिजांची उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे दिसले असता त्यांना सदर ट्रॅक्टर पकडले व रेती वाहतुकीची अवैध परवानगी मागणी केली असता, सदर ड्रायव्हरकडे कोणत्याही प्रकारची वाहतूक परवाना नव्हता त्यांनी लगेच त्यांचे मालकाला फोन करून नदीपात्रात बोलावून घेतले, नदीपात्रात दोन चाकी वाहने आले असता, सदर वाहनाचा क्रमांक Mh 28 BL 3644 आहे,व दोन चाकी वाहन क्रमांक MH 28 BH 4708 या वाहनावर ट्रॅक्टर मालक व सोबत व्यक्ती असे नदीपात्रात आले,त्यांनी अधीकाऱ्याना विचारणा केली तुम्ही कोण आहे तर त्यांना परिचय दिला असता राहुल तायडे तहसीलदार नांदुरा व मंडळ अधिकारी अनिल जोशी आहे, आपले वाहन अवैध आहे,आपण सदर वाहन तहसील कार्यालय नांदुरा येथे घेऊन चला सदर वाहन मालक पैसोडे राहणार दादुलगाव तालुका जळगाव जामोद व इतर यांनी वाहनांच्या दूर व्हा… ताकद असेल तर ट्रॅक्टर अडवून दाखवा,असे म्हटले व अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली, व ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेले सदर वाहनांमध्ये अंदाजे 01 ब्रास रेती ची किंमत 3100/- रुपये आहे हे सर्व 7 ते 8 लोक असल्यामुळे त्यांना अधिकारी रोखण्यास असमर्थ ठरले, सदर महेश पाटील व पैसोडे रा,दादुलगांव तालुका जळगाव जामोद यांनी आमचे शासकीय कामात अर्थडा निर्माण केला, तसेच अवैध रेती वाहतूक उत्खनन करीत होते,तलाठी अभिजीत आमले यांना त्यांनी धमकी दिली, की परत नदीपात्रात आले,तर जिवंत अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकू असे म्हटले त्या प्रमाणे त्यांनी वरील आठ ते दहा लोकांनी शासकीय कामात अडथळा अर्थडा निर्माण केला आणि जिवंत मारण्याची धमकी व अवैध रीत्या रिती या गौण खनिजांची उत्खनन करून वाहतूक केले, असल्यामुळे सदर व्यक्तीवर मोक्का अंतर्गत कारवाई संबंधीता विरुद्ध गुन्हे दाखल कायमी अप नंबर 153/2021 कलम 353/332/143/ 147/ 149/ 504 भादवि कलम 7 क्रिमिनल लॉ अमेडमेट अक्ट 1932 सह कलम 48 (7) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966,या नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असे नांदुरा तहसीलदार यांनी एका प्रेस नोट द्वारे सांगीतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here