गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपले आयुष्य समर्पीत करणार्या राणा चंदन यांचे मागील ९ सप्टेंबर रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने चंदन परिवारावर दुःखाचा डोंगर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आभाळ कोसळले आहे. कार्य करतांना कुणाचीही जात, धर्म किंवा पक्ष-संघटना न बघणार्या राणाने समाजात माणूसकी पेरली…चळवळीतील एक आदर्श नेता आणि आयुष्यात निर्मोही असणार्या राणाजींप्रति अनेकांच्या मनात आदर, प्रेम, आपुलकी आणि सन्मान आहे. मन हेलावून आणि डोळे पाणावून गेलेल्या राणाजींसाठी मनात दाटलेल्या भावना व्यक्त करण्याची सर्वांचीच इच्छा आहे. एखाद्या व्यक्तीमत्वाचे न माहिती असलेले पैलूही सर्वांपर्यंत पोहोचले पाहीजेत, या हेतूने स्वाभिमानी शेतकरी संघटना परिवाराकडून स्व. राणा चंदन यांना ‘जाहीर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तमाम बुलडाणेकर तसेच राणाजींवर प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग यांनी याची नोंद घ्यावी.
दिनांक ः बुधवार, १५ सप्टेंबर २०२१
वेळ ः सायंकाळी ४ वाजता.
स्थळ ः बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी सभागृह, मलकापूर रोड, बुलडाणा
विनीत ः स्वाभिमानी शेतकरी संघटना परिवार,बुलडाणा._

