नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी राज्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये याची दखल घेत जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती त्या अनुषंगाने नांदुरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड यांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून नांदुरा शहरात दाखल देखील झाली आहे.सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते आज संपन्न झाला सदर रुग्णवाहिका रुग्णांसाठी देवदूत म्हणून काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने नांदुरा पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनिताताई डीवरे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,युवा सेनेचे श्री.ईश्वर पांडव,नायब तहसीलदार श्री.संजय मार्कंड, डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.खोद्रे, डॉ.जैस्वाल, डॉ.घाटे,,डॉ.पायल पाटील,विजय पायघन, दादागावचे सरपंच श्री.गणेशराव काटे प्रामुख्याने उपस्थित होते.







