Home Breaking News आवार गावातील विठ्ठल मंदिराच्या कळसावर वीज कोसळली मंदिरावरील घुमटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

आवार गावातील विठ्ठल मंदिराच्या कळसावर वीज कोसळली मंदिरावरील घुमटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

509

 

आवार गावावरील संकट विठू माऊली ने तारले

बुलढाणा  जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आवार गावामध्ये रात्रीच्या वेळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला त्यातच रात्री सात वाजे दरम्यान गावातील मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिरावरील घुमटावर वीज कोसळल्याने मंदिराच्या कळसाचे घुमटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी रात्री सात वाजे दरम्यान घडली

आवार गावातील विठ्ठलाचे मंदिर गावाच्या मध्यभागी असून मंदिराला लागूनच बरेच नागरिकांचे घरे या मंदिराला लागूनच आहेत मात्र इतर कुठल्याही घरावर किंवा गावात इतर ठिकाणी कुठे वीज न पडता गावातील विठ्ठलाच्या मंदिरात वरच ही वीज कोसळल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाले
तसेच याच मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी सहा ते सात वाजे दरम्यान हरिपाठाचा कार्यक्रम असतो मात्र आज सहा वाजता पासुनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे मंदिरावरील हरिपाठाचा कार्यक्रम नागरिकांनी घेतला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली