हिंगणघाट दि.२८ स्थानिक ए .बी .ग्रुपच्यावतीने
दि २५,२६,२७ सेप्टेंबर दरम्यान फुटबाॅल टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले.शहरातील टाका ग्राउंड येथे सदर टूर्नामेंटचे आयोजित करण्यात आले होते. शहरातील सामाजिक कार्यकर्ते मलक यासीन यांच्या अध्यक्षते खाली सदर टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक ए.बी. ग्रुपची संचालक मानसिंग किटे यांच्या हस्ते प्रथम बक्षीस ११ हजार रुपये व शील्ड. F . C. ब्लुज वर्धा यांना देण्यात आले.
मलक यासीन यांच्या शुभहस्ते दुसरे बक्षीस ७ हजार व शिल्ड फ्रेंन्डस क्लब हिंगणघाट यांना देण्यात आले. तीसरे बक्षीस पत्रकार इकबाल पहेलवान यांचे हस्ते ५ हजार रुपये व शील्ड स्थानिक ए. बी .ग्रुप ला देण्यात आले .या कार्यक्रमाचे संचालन नदीम शेख यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शेख शरीफ, एजाज ,नावेद, शाहरूख, परवेझ,मुख्तार ,राहील शेख अहेफाज खान ,इत्यादिनी सहकार्य केले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

