ओबीसींचे आरक्षण परत मिळविण्यासाठी जळगांव जामोद येथे शहर व तालुका भाजपचे रास्ता रोको आंदोलन.

0
336

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:

दिनांक 26 जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसींचे राजकीय आरक्षण या सरकारने घालविल्य राज्यव्यापी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन घोषित केले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता स्थानिक पेट्रोल पंपाजवळ शहर व तालुका जळगाव जामोद भारतीय जनता पार्टी तर्फे रवींद्रशेठ ढोकणे ओबीसी सेल बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी

उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो

महाभकास आघाडी सरकारचा निषेध असो

ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में

*ओबीसी का नेता कैसा हो डॉक्टर संजय कुटे जैसा हो

यासह इतर घोषणा देत रस्त्यावर ठिय्या देण्यात आला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, डॉक्टर प्रकाश बगाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रवींद्र शेठ ढोकणे यांचे मार्गदर्शन मार्गदर्शनपर भाषणे झाली त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध करून पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी आंदोलनस्थळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शेठ ढोकणे जळगाव जामोद जिल्हा सरचिटणीस नंदू भाऊ अग्रवाल जिल्हा सचिव रामदास बोंबटकार, गुणवंत राव कपले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा परिषद बुलढाणा विरोधीपक्षनेते बंडूभाऊ पाटील, नगरसेविका रत्नप्रभा खिरोडकर सविताताई कपले महिला शहराध्यक्ष शिल्पा भगत, ग्रा प सदस्या सारिका तुपकरी, शांताबाई तायडे, सुनीता म्हसाळ, नगरसेवक शैलेंद्र बोराडे आशिष सारसर, निलेश शर्मा, पस सदस्य एकनाथ वनारे, पस सभापती रामेश्वर राऊत, उपसभापती महादेव धुर्डे, अशोक काळपांडे, विजय तिवारी, भेलके टेलर, श्याम देवताळू, संजय पांडव, चंद्रकांत वाघ, मुरलीधर राऊत, राजेंद्र उमाळे, एम. आर. इंगळे, युवमोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे,शहर अध्यक्ष उमेश येउल, पंकज देशमुख, शाकीर खान, जमीर टेलर, आझम खान, अशपाक, गणेश शेजोळे, अंबादास निंबाळकर, संदीप तुपकरी, सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, भास्कर राऊत, खवले टेलर, डिगंबर हिवरकार यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here