कासारखेडा शिवारात जंगलातील विहीरीत पडुन पाण्यात बुडुन आदीवासी युवकाचा दुदैवी मृत्यु पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

0
339

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा जंगलातील कासारखेडा शिवारातील शेतातील विहीरीत पडुन पाण्यात बुडुन आदीवासी तरूणाचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली असुन याबाबत पोलीसात नोंद करण्यात आलेली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की दिनांक ११ जुलै रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास मोहम्मद हबीब तडवी वय२२ वर्ष राहणार कासारखेडा तालुका यावल हे व आम्ही जंगलातुन येत असतांना कासारखेडा शिवारातील मनुदेवी मंदीर रोडा वरील सायबु तडवी यांच्या शेतातील विहीरीजवळ जावुन पहात असतांना अचानक मोहम्मद तडवी याचा तोल जावुन तो खोल व पाण्याने भरलेल्या विहीरीत जावुन पडल्याची घटना घडली असुन त्याच्या सोबत असलेल्यांनी तात्काळ ही सुचना त्यांच्या कुटुंबास दिली त्या वेळेस रात्री त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी विहीरीच्या घटनास्थळी पाहणी केली असता शोध घेण्याच्या प्रयत्न केले असता विहीरीस असलेले पाणी व रात्रीचा अंधार या मुळे तडवी याचा शोध घेता आला नाही नंतर सकाळी मोहम्मद तडवी याचा मयत अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले , मयताचा त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी. बी . बारेला व डॉ . शुभम तिळके यांच्या उपस्थित करण्यात आले असुन, यावल पोलीस स्टेशनमध्ये इतबार बशीर तडवी यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here