Home Breaking News कृषी विभागाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळवून द्यावा आमदार समिर...

कृषी विभागाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळवून द्यावा आमदार समिर कुणावार यांचे आवाहन

819

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२२ जुलै हिंगणघाट तालुक्यातील १५ तसेच समुद्रपुर तालुक्यातील ११ गावांचा पोकरा योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबागा तसेच सिंचन योजनेसारख्या अनुदान मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी जास्तीतजास्त प्रयत्न करावे असे आवाहन आढावा बैठकीच्या वेळी आमदार समिर कुणावार यांनी केले.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा)अंतर्गत आज दि.२२ रोजी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली
आढावा सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेचे आयोजन स्थानिक पंचायत समीती सभागृह येथे करण्यात आले.
या सभेत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आढावा सभेच्यावेळी आमदार समीर कुणावार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे,समुद्रपुर पंचायत समितीच्या सभापती सौ सुरेखाताई टिपले,हिंगणघाट पंचायत समिती सभापती सौ शारदाताई आंबटकर,जिल्हा परिषद सदस्य सौ ज्योत्स्नाताई सरोदे,गटविकास अधिकारी दिनेश चौधरी इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते,तालुका कृषी अधिकारी नंदकुमार घोड़मारे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.सदर आढावा सभेमध्ये समुद्रपुरचे तालुका कृषी अधिकारी एमजी सोनटक्के,हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी आर बि.गायकवाड,मंडल कृषी अधिकारी सुपारे,जीबी बनसोडे,सीबी कारंजेकर,आर मेश्राम यांनी उपस्थिति होती.