हंसराज उके अमरावती
अमरावती-: दिनांक ४सप्टे २०२१ कोरोना संकट असतानाच आता यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू मलेरियाने डोके वर काढले आहे यवतमाळ येथील वसंतराव नाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी
मोठ्या संख्येने गर्दी दिसुन येत आहे विशेषतः हे प्रमाण लाहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहे त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले
यवतमाळ जिल्ह्यात ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३५ उपकेंद्र आहेत याठिकाणी आता पर्यंत ३४१७ ईलायझा आणि रॅपीड टेस्ट केल्या त्यापैकी १८१ रुग्ण डेगुचे आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागात आहे परंतु या पेक्षा किती तरी जास्त रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या मध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये डेंग्यूचे , टायफाईड, आणि मलेरियाच्या आजारांची लक्षणे आढळुन येत असल्याने
सगळीकडे रुग्णालय हाऊस फुल झाल्याचे चित्र झाल्याचे दिसून येते आहे…..







