Home Breaking News खुमगाव ते दहिगाव शिवरस्ता तसेच शिवारातील इतर शिवरस्ते मोकळे करून मिळण्यासाठी सरपंचाचे...

खुमगाव ते दहिगाव शिवरस्ता तसेच शिवारातील इतर शिवरस्ते मोकळे करून मिळण्यासाठी सरपंचाचे तहसीलदार यांना निवेदन

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

खूमगाव( ता.नांदुरा )येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारणीच्या वतीने आज दिनांक १ मार्च २०२१ रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. खुमगाव ते दाहिगाव शिवरस्ता तसेच खुमगावं शिवारातील इतर शिव रस्त्यावर शेतकर्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे शेतकऱ्याना तसेच गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर शिवरस्ते मोकळे झाल्यास शेतकर्यांच्या शेतात वाहने गेल्यास शेतकर्याना आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल तरी आपण या विषयावर जातीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून रस्ते मोकळे करावे ही विनंती या आहायचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर सरपंच रोहित सोनोने,उपसरपंच महेंद्र गोळे,सदस्य गजानन सातव,गजानन वावगे,निवृत्ती इंगळे उपस्थित होते.