चार तासाच्या आत पळालेला आरोपी आमगाव पोलिसांच्या ताब्यात

0
257

 

आमगाव,दि.२५:–दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (वय २४ रा. नवेगाव खैरलांजी,मध्यप्रदेश)हा पोलीस कोठडीत असताना आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनआवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला असता सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला झटका देत भिंतीवरुन कुदून फरार झाला होता़ दरम्यान आमगावचे पोलीस निरिक्षक विलास नळे यांच्यासह स्थानिथ गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवित आमगाव नजीकच्या एका गावातून ताब्यात घेतले आहे़़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here