पातुरडा बु प्रतिनिधी
वाढदिवस म्हटले की केक,लहान मुलांची पार्टी,व इतर गोष्टी वर होणारा खर्च हे आपण प्रत्येक वाढदिवस मध्ये पाहतो मात्र पातुर्डा येथील माजी सरपंच निलेश चांडक यांचा मुलगा मानव निलेश चांडक या 5 वर्षीय मुलाने आपला वाढदिवसावर कोणताही अनाठायी खर्च न करता जे गरीब कुटुंब आहेत ज्यांना काम केल्यावरच 2 वेळच जेवण मिळते आशा काही कुटुंब ला आपल्या 5 व्या वाढदिवसानिमित्य किराणा सामान वाटप केले व कोणत्याही आपल्या मित्राला न बोलवता आपल्या परिवार मधील व्यक्ती सोबत गरीब कुटुंब ला वाटप केले मागील वर्षी ही मानव च्या वाढदिवस निमित्य सॅनिटायझर,मास्क व इतर कोरोना काळात लागणाऱ्या वरस्तू चा वाटप केला होता या विधायक कार्याची नागरीका कडून स्तुती होत आहे या वेळी मानव ची आजी,वडील,बहीन,भाऊ उपस्थित होते







