जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे ग्रामपंचायत सदस्य पळवापळवीच्या राजकारणाला वेग

0
461

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे येत्या 27 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सरपंच पदाचेआरक्षण जाहीर होणार आहे त्यानंतर दोन दिवसांनी महिला आरक्षणाची सोडत.

जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे परंतु सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे त्यामुळे अगदी समसमान जागा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या गटाचा सरपंच होईल.

ही बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8165

 

याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे अशातच सूनगाव येथे भाजपा समरथीत पॅनलचे 8 व आघाडी समरथीत 8 असे सदस्य विजयी झाले.

व एक अपक्ष व अपक्ष सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने आघाडीचा सरपंच होईल असे चित्र तयार झाले असतानाच आघाडी गटाचा एक सदस्य 15 जानेवारी रात्रीपासून भूमिगत असल्याची चर्चा आहे .

असे चित्र कमी-अधिक प्रमाणात अन्य ग्रामपंचायतीमध्ये ही सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दिसणार आहे ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्याने हा पक्षांतराचा कायदा लागू होत नाही .

त्यामुळे एका गटाच्या सदस्यांनी दुसऱ्या गटाला सहकार्य केले तर त्याचे सदस्यत्व रद्द होत नाही त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर हे फोडाफोडीचे राजकारण पाचही वर्ष चालत राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here