जे.सि.बि. चोरणा-या चोरट्यास अल्लीपुर पोलीसांनी केली अटक

0
603

 

अल्लीपुर :- दि. 21 मार्च
फिर्यादी अशोक पांडुरंग डगे, वय 60 वर्ष, रा. भवानी वार्ड, अलीपुर यांचे मुलाचे लग्र असल्याने ते लग्नाचे कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांचेकडे जे.सि.बि. चालविण्याचे काम मागण्यास आलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादीचा मुलगा अतुल पांडुरंग ढगे यांचे मालकीचा रुपये 18,00,000/ किंमती जे.सि.बि. क. MH-32-AH 1923 हा चोरुन नेला अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन दि. 22 मार्च रोजी पोस्टे. अल्लीपुर येथे अप क्र. 236/22 कलम 379 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी अल्लीपुर पोलीस पथकाला सुचना देण्यात आल्या. पोलीस पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवुन सदर आरोपी बाबत बोरखेडी नागपुर येथील टोलनाक्यावरून अनोळखी आरोपी बाबत माहीती गोळा केली. सदर माहीती वरून पोलीस पथकाने प्रथम नागपुर त्यानंतर भंडारा गाठले तेथे मिळालेल्या गुप्त माहीती वरून अखेर पोलीस पथकाला आरोपी संतलाल देवचरन टंडन वय 36 वर्ष रा. रामपुरा तह. साजा जि. बेमेतरा राज्य छत्तीसगड यास भंडारा ते राजनांदगाव रोडवर चीचोली. छत्तीसगढ जवळुन चोरलेल्या जे.सी.बी. सह ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव थी. आबुराव सोनवने व श्री. गोकुलसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल गाडे यांचे निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्रील भोजगुडे, पो.हवा. अजय रिठे , विनोद बुरीले ना.पो.हवा. शंकर पोहाणे , संदीप झिले ,अभय वानखेडे , यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here