डोंगर कठोरा येथे नादुरूस्त महीला शौचालय कोसळण्याच्या मार्गावर ग्राम पंचायत लक्ष द्यावे ग्रामस्थांची मागणी

0
454

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

केन्द्र शासन व राज्य शासनाच्या केन्द्रस्थानी असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाचे तिन तेरा वाजवणारी ग्रामपंचायत म्हणजे तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्राम पंचायत म्हणावी लागेल , डोंगरकठोरा येथील बेघर वस्तीतील सार्वजनिक महीला शौचालय कोसळण्याच्या मार्गावर असून कोणतीही अप्रीय घटना होवु नये याची काळजी घेवुन या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवुन शौचालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे . या संदर्भातील माहीती अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात परसाडे मार्गावरील बेघर वस्तीत असलेल्या महीलासाठीची सार्वजनिक शौचालय कुठल्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर असुन नादुरुस्त शौचालयामुळे महीलांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसुन येत असुन , याविषयी गावातील नागरीकांनी व महीलांनी वारंवार तोंडी तक्रार ग्राम पंचायत कडे करून देखील या महिलांच्या व त्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे कारभारी बेजबाबदारपणे वागणुक देवुन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत . दरम्यान काही दिवसात होवु घातलेल्या पावसाळ्या ही महीलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालय कोसळल्यास काही अप्रीय घटना घडल्यास यास पुर्णपणे जबाबदारी ही डोंगर कठोरा ग्रामपंचायतीची असणार अशा ग्रामस्थांच्या तक्रारी व ग्रहाणे आहे . दरम्यान डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातुन मागील दोन वर्षा पासुन शासनाच्या विविध विकास कामांसाठीच्या मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीच्या माध्यमातुन सर्व अत्यंत निकृष्ठ प्रतीची कामे करण्यात आली असून , या कामांविषयी ग्रामस्थांच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी असतांना ही संबधीत अधिकारी यांच्याकडुन या कामांची गुणवत्ता चौकशी न करता निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले काढली जात असल्याची डोंगर कठोरा ग्रामस्थांची ओरड आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here