संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू.
(दररोज हजारो ब्रास रेती वाहतूक सुरू, महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष)
संग्रामपूर तालुक्यात मागील काही महिन्यापासून नदी व नाल्यांना रेती तस्करांची काळी नजर लागली असून सर्रास रेतीचे उत्खनन करून त्याची ट्रॅकटर, टाटा 407, डीसीएम व इतर वाहनातून अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे. त्यामुळे नदी, नाल्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत दिवसाकाठी हजारो ब्रास रेतीचे तस्करी करण्यात येत आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी दररोज याच रस्त्याने ये-जा करत असून हे महाशय अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. दि. 14 मार्च रोजी रिंगणवाडी येथील वान नदीतून एम एच —- संग्रामपूर कडे जात असतांना वरवट बकाल येथील कृष्णा कॉम्प्लेक्स जवळ तहसीलदार कोरे पायी जात असताना ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार यांना कट मारून वरवट गावात पळ काढून तहसीलदार पाठलाग करत असल्याचे समजताच वाहन चालकाने मुख्य रस्त्यावर 500 फूट रेती रस्त्यावरच खाली केली. विशेष 18 फेब्रुवारी रोजी एका टिप्परने रेती भरलेले वाहन नेकणामपूर फाट्याजवळ रस्त्यावर खाली केल्याने त्या अपघातात वरवट बकाल येथील पांडुरंग ढगे यांचा मृत्यू झाला होता. ते राहत असलेल्या घरापासून पोस्ट ऑफिस च्या समोरून मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ पर्यंत रेती खाली करून पळ काढला. गावातील काही लोकांनी ट्रॅक्टर ची चावी काढून टायर पंचर केले तरीही वाहन चालक तेथून वाहन घेऊन फरार झाला. गावातील सरपंच व सदस्यांनी तहसीलदार तेजश्री कोरे यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. या रेती तस्करीमुळे गावातील एक जीव गेला असून गावातील नागरिकांनी तहसीलदार कोरे यांना 1 तास धारेवर धरले. मागील 18 फेब्रुवारी रोजी रेतीने भरलेले टिप्पर शेगावकडे जात असताना वानखेड फाट्यावरून महसूल ची गाडी त्या टिप्पर च्या मागे लागल्याने त्या तस्कराने ते रेतीने भरलेले टिप्पर नेकनामपूर फाट्यावर रस्त्यावरच खाली करून टाकले व तेथून पळ काढला. त्यामुळे त्या रात्री 8 ते 10 मोटारसायकलचा त्या रेतीवरून घसरून अपघात झाला. त्या अपघातातील पांडुरंग पुंजाजी ढगे वय 47 वर्ष हे शेगाव वरून वरवट ला जाण्यासाठी निघाले संध्याकाळी 7 वाजता ढगे यांची मोटारसायकल त्या रेतीवरून घसरून अपघात झाला. ढगे यांना डोक्याला व पाठीला जबर मार लागला होता. त्यांना तेथून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर अकोला येथे नेण्यात आले होते. तेथून सुध्दा डॉक्टरांनी नागपूर येथे रेफर केले. 3 दिवस उपचार केले असून आज दि. 24 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ह्याआधी सुध्दा असेच अवैध रेती वाहतुकीमुळे कित्येक बळी गेले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील अवैध रेती वाहतूकिला आळा घालावा अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
वास्तविक पाहता गौण खनिजाला आळा बसावा म्हणून तहसील प्रशासनाने पथकाची निर्मिती केली आहे परंतु या रेती तस्करांकडे हे पथक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कुठंतरी पाणी मुरत असल्याची शंका येत आहे. विना नंबर व बनावट नंबरच्या वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असून व या तस्करांचे दलाल महसूल विभागाचे लोकेशन या तस्करांना देत असल्याने कारवाई करण्यात महसूल विभाग यांचे पथक कुचकामी ठरत आहे.
पंचनामा करून कारवाई करण्यात येईल. मी पायी चालत होती त्यावेळी ह्या ट्रॅक्टर ने मला कट मारून वरवट गावात पळ काढला व भर रस्त्यात ट्रॅक्टरमधली रेती खाली करून तेथून पळ काढला. त्या वाहनाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तेजश्री कोरे, तहसीलदार संग्रामपूर.