तहसीलदार, बि.डि.ओ . तालुका आरोग्य अधिकारी, यांनी केली साखरखेर्डा येथील कोविड सेंटर साठी सहकार विद्या मंदिर याची पाहणी ।

0
387

 

(कोवाड सेंटर साठी सहकार विद्या मंदिराला पसंती )

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

वाढता साखरखेर्डा परिसरामध्ये कोरोना चा संसर्ग बघता ‘साखरखेर्डा येथे कोरोना रुग्णांसाठी कोवाड सेंटर व्हावे .ही मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी
पालकमंत्री डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे लावून धरली होती .
त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी होकार सुद्धा दिला होता !त्यादृष्टीने अगोदर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी श्री पलसिद्ध संस्थान येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी केली होती .परंतु श्री पलसिद्ध संस्थान हे साखरखेरडा गावातच येत असल्यामुळे ‘तिथे कोविड सेंटरची उभारणी करणे कितपत योग्य हा प्रश्न पडल्यामुळे !

नवीन जागेचा शोध सुरू झाला ‘
त्यादृष्टीने ‘साखरखेर्डा येथील सूतगिरणीच्या जवळील ‘सहकार विद्या मंदिर ची ‘कोविड सेंटर उभारण्यासाठी ‘ दिनांक 23 एप्रिल ला पहाणी
करण्यात आली ‘
यावेळी सिंदखेडराजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ‘श्री गुणावंत ‘तहसीलदार श्री सुनील सावंत .तालुका आरोग्य अधिकारी डॉ .महेंद्रकुमार साळवे ‘साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमार सुरुशे,साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे ‘दुय्यम ठाणेदार दीपक राणे .

माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव ‘साखरखेर्डा नगरीचे सरपंच दाऊद सेठ कुरेशी ‘तलाठी ‘मांडगे ‘तलाठी श्री शिंगणे ‘तलाठी पवार मॅडम ‘ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष अमित जाधव ‘
उपसरपंच प्रवीण पाझडे ‘माजी सरपंच कमलाकर गवई .माझी पंचायत समिती उपसभापती सुनीलभाऊ जगताप ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘ललित शेठ अग्रवाल ‘
ग्रामपंचायत सदस्य सय्यद रफिक ‘
माजी सभापती राजू ठोके ‘सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य ‘आदी पाहणी करतांना उपस्थित होते ‘

यावेळी आता गटविकास अधिकारी ‘ तहसीलदार ‘ तालुका आरोग्य अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे !

व लवकरात लवकर साखरखेर्डा येथे कोविंड सेंटर सुरू व्हावे हीच सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे ‘
त्यादृष्टीने पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे प्रयत्नरत असून ‘त्यांच्या माध्यमातून साखरखेर्डा येथे लवकरच कोरड सेंटर सुरू होईल अशी अपेक्षा आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here