Home Breaking News तहसील कार्यालयात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तहसील कार्यालयात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

नांदुरा तहसील कार्यालयात आज गुरुवारी सकाळ 9 च्या सुमारास एक 45 वर्षीय तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अनिल लक्ष्मीण अंभोरे असे या तलाठ्याचे नाव असून तो 45 वर्षाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्त असे की नांदुरा तहसील अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत असलेले अनिल लक्ष्मण अंभोरे यांनी तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या केबिन मधील स्वछता गृहात गळफास घेतली.सदर प्रकार आज गुरुवार सकाळी 10 वाजता उघडीस आला.सदर घटनेची माहिती नांदुरा पोलीस स्टेशन ला प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास चालू आहे.वृत्त संकलन पर्यंत तपास सुरू होता.