तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत १३६ बुधवर १२८९८ बालकांना पोलीओ डोस दो बुंद जिंन्दगीके ९२ % उदिष्ट पुर्ण

0
463

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत आरोग्य विभागा करवी १३६ बुध वर ३६९ आरोग्य कर्मचारीची नियुक्ती करण्यात आली होती तालुक्यात पातुर्डा , सोनाळा, वानखेड , संग्रामपुर या गावात ग्रा प , अंगणवाड्या , शाळा , विद्यालयात पोलीओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती यात तालुक्यात १३७६३ बालकांना पोलीओ डोस अपेक्षीत होते त्यात पाच वर्षा वरिल १३९ बालकांना तर पाच वर्षा खालील १२७५९ असे एकुण १२८९८ बालकांना पोलीओ डोस देण्यात आले पातुर्डा येथे ग्रा प कार्यालयात बुथ वर लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ , प्रा आरोग्य केंन्द्रात बुथ वैधकिय अधिकारी अंभोरे यांचे हस्ते बालकांना पोलीओ डोस देऊन शुभारंभ करण्यात आला सकाळी ८ वाजे पासुन ५ वाजे पर्यत पोलीओ डोस बालकांना देण्यात आले
संग्रामपुरात तालुका आरोग्य अधिकारी रोजतकार नगर पंचायतचे सहाय्यक अधिकारी कोल्हे यांनी बालकाना पोलीओ डोस दिले तर गाव निहाय लोकप्रतिनिधी, समाज सेवक , ग्रा प सदस्य यांच्या बालकांना पोलीओ डोस देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी ता वै अधिकारी रोजतकार , वैधकिय अधिकारी डॉ उजवणे , वैधकिय अधिकारी डॉ अंभोरे गाव निहाय आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी सेविका , ग्रा प सदस्य , सामाजीक कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here