दहीहंडा पोलिसांची वरली मटक्या च्या जुगारावर वर धडाकेबाज कारवाई

दिपक रेळे
प्रतिनिधी अकोट

अकोट दि 29/08/20 दहीहांडा पो.स्टे अंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका व लोतखेड येथे सुरु असलेल्या वरली मटका च्या जुगारावर काही इसम हारजीत करत असल्याची माहिती दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान लोतखेड झोपडपट्टी परिसरात धाड टाकून एका इसमास वरली च्या आकड्यावर हारजित करताना अटक केली व त्याच्याकडून वरली च्या आकडे लिहिलेले 1पान,कार्बन तुकडा ,डॉट पेन व 1260/-रुपये नगदी जप्त करून कायदेशीर कारवाई केली तसेच दुपारी 13.45 ते 14.15 वाजता च्या दरम्यान पोलिसांनी आणखी वरुर येथील पठार नदीच्या काठावर धाड टाकून उपकेंद्रा समोर आरोपी विठ्ठल बिसन इंगळे वय.52 वर्ष रा.वरूर जऊळका या इसमास वरली च्या आकड्यावर पैशांची हारजित करीत असताना अटक केली त्याच्याकडून वरली मटक्याचे आकडे लिहिलेले बुकाचे चार पाने,डॉट पेन,कार्बन तुकडा व नगदी 1310/-रुपये जप्त केले दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनखाली HC अरुण घोरमोडे ब न 643 , PC ठाकूर ब न 1250 यांनी केली
दहीहंडा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई मुळे वरली बहद्दरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

Leave a Comment