Home Breaking News नंदोरी गावात खुलेआम अवैध दारू विक्री

नंदोरी गावात खुलेआम अवैध दारू विक्री

0
366

 

 

नंदोरी गावातील मुख्य चौकात होते दारू पिणार्यांची गर्दी

नंदोरी गावातील बाजार चौकात अवैध दारूचा महापूर

 

नंदोरी गावातून सर्वसामान्याना जाणे आता अडचणीचे होत आहे. या ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठ चौरस्ता जागेत खुलेआम अवैध देशी – विदेशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे ही जागा अवैध धंदे करणाऱ्यासाठी फार महत्त्वाची ठरत आहे.
सध्या या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैधरित्या थाटलेल्या या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. या तळीरामाच्या त्रासाला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. तात्पुरता आडोसा तयार करून या ठिकाणी हे अड्डे सुरू करण्यात आले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक काही पोलीस कर्मचारी या अवैध दारू विक्रेत्यांना मदत करतात असे बोलले जात आहे
या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.
नंदोरी गावात अवैध दारू विक्रेत्यांचा आपसी मतभेद सुरू असल्याचे असे गावात चर्चा आहे मागील काही दिवसापासून मोठे अवैध दारू तस्करांनी नंदोरी या गावात आश्रय घेतल्याचे पण सांगण्यात येत आहे या अवैध दारू तस्करांचे आपसी मतभेदांमुळे गावातील शांतता भंग होण्याच्या मार्गावर आहेत तरी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here