नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा-भिकारमौशी ग्रामवासी तथा परिसरातील नागरिकांची उपवनसंरक्षक यांचेकडे मागणी.

0
392

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-मागील काही दिवसांपासून परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.वाघाने अधिक उग्र स्वरूप धारण केले असून या परिसरातील दयाराम धरी धुंडेशिवनी,डंबाजी डोंगरे चुराचुरा,गोविंदा गावतुरे राजगाटा पुंडलिक भिकारमाथी वंदना जंगठे दिभना कल्पना चौधरी महादवाडी शोभा मेश्राम जेप्रा.संध्या चिलमवार इंदिरानगर,मंजुळाबाई चौधरी गोगाव,चापले बाई गोगाव अशा १० ते १५ शेतकरी व शेतमजुरांचा या वाघाने बळी घेतला आहे.५० ते ६० पाळीव जनावरे वाघाने आतापर्यंत फस्त केले आहेत.एवढे सगळे घडूनही वनविभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत एवढ्या दिवसात नरभक्षक वाघापासून शेतकरी व शेतमजुरांच्या स्वंरक्षणासाठी वनविभागाने कसल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही.या परिसरातील शेतकरी व शेतमजूर नरभक्षक वाघाच्या दहशतीत जीवन जगत आहेत. परिणामी ते आपल्या शेतावर जाऊ शकत नाहीत.अगोदरच पावसाने दडी मारली आहे आणि आता वाघाची दहशत अशा दुहेरी संकटात शेतकरी व शेतमजूर सापडला आहे.सद्या शेतीमध्ये निंदणी करणे,खत टाकणे,कीटकनाशके फवारणे, पिकांना पाणी देणे इत्यादी कामे करावयाची असूनही वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी ही कामे करू शकत नाही. परिणामी शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. आपल्याकडे कोसा (रेशीम) उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून तो कोसा उत्पादनासाठी जंगलावरच अवलंबून आहे. वाघाच्या दहशतीमुळे तीसुद्धा रेशीमशेती करू शकत नाही,असेच जर चालू राहिले तर शेतकरी व शेतमजुरांवर उपासमारीची वेळ येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार आपला वनविभाग असेल.
त्यामुळे पुढील दोन दिवसात या नरभक्षी वाघाला जेरबंद करून वाघाचा बंदोबस्त केला नाही तर जनतेच असंतोषाचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि या असंतोषाचे जे पडसाद उमटतील त्याला परिसरातील शेतकरी व शेतमजूर जबाबदार राहणार नाही.वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर या परिसरातील शेतकर आंदोलनाचा मार्ग अवलंबतील आणि याला सर्वस्वी वनविभागाच जबाबदार असेल,म्हणून महोदयांनी सदर प्रकरणामध्ये जाती लक्ष घालून नरभक्षी वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची उपवनसंरक्षक यांचेकडे सादर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here